अहमदनगर
जिल्हास्तरीय मीडिया संमेलन,राहुरी जि. अहमदनगर
रविवार दि .2 डिसेंबर, 2012 रोजी राहुरी येथे अहमदनगर
जिल्हास्तरीय
मीडिया संमेलनाचे आयोजन -
राहुरी जि.
अहमदनगर येथे एका आगळ्या वेगळ्या विषयावर मीडिया संमेलनाचे आयोजन
रविवार दि. 2 डिसेंबर, 2012 रोजी करण्यात
आले आहे. प्रसार माध्यमातील बदलते प्रवाह आणि मूल्यांची
पुनस्र्थापना.
पारंपरीक मीडियाच्या साधनांनी नवमाध्यम
तंत्रज्ञान आत्मसात करुन कात टाकली आणि मीडिया अधिक शक्तिशाली आणि वैश्विक बनला, मुद्रीत माध्यम, इलेक्ट्रॉनिक
माध्यम, सायबर माध्यम या मीडियाच्या तीनही प्रकारात
अमुलाग्र बदल झाले आहे, होत आहे आणि यापुढेही होत राहील.
परंतु प्रश्न उठतो या बदलात मूल्यांची हेळसांड होत तर नाही ना ? आपल्या शाश्वत मूल्यांची, चारित्रीक मूल्यांची,
पायमल्ली तर
होत नाही ना ? माध्यमे आणि मूल्यें यांची फारकत
तर झाली नाही ना ? या प्रश्नांची
उत्तरे शोधणे आणि मूल्यांच्या पूनस्र्थापनेसाठी एक सर्वसमावेशक कृतीयोजना तयार
करणे यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.